क्रीडा

चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी

युएईत आयपील खेळण्यात येणार आहे, मात्र चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जण कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत.

कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती समोर  आहे. यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे.

राजस्थान, पंजाब या संघांनी आपला क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची करोचा चाचणी करण्यात आली होती. मात्र संघातील सपोर्ट स्टाफमधले १२ सदस्य आणि एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of