क्रीडा

न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज ब्रेंडन मॅकलमने केली निवृत्तीची घोषणा

न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलमने सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्यानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकून ही निवृत्ती जाहीर केली. मॅकलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने पहिल्यांदाच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

 

 

सध्या मॅकलम कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये टोरोंटो नॅशनल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर तो युरो ट्वेंटी-20 स्लॅममध्ये सहभाग घेणार होता, परंतु त्याने याही स्पर्धेतून माघार घेतली आहे.

मॅकलमने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो विविध ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळत होता. गतवर्षी त्याला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये एकाही संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही. त्याने न्यूझीलंड संघाकडून 101 कसोटी आणि 260 वन डे सामने खेळले आहेत. ”ग्लोबल ट्वेंटी-20नंतर मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. अभिमानानं आणि समाधानानं मी हा निर्णय जाहीर करत आहे. मी आता युरो ट्वेंटी-20 स्लॅममध्ये खेळणार नाही आणि आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागत केले,”असे मॅकलमने लिहीले आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of