क्रीडा

प्रेक्षक कधी स्टेडियममध्ये परततील..?

नवी दिल्ली – क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी शुक्रवारी सांगीतले की, ते दर्शकांची स्टेडियम मध्ये परतण्याची नेमकी वेळ सांगू शकणार नाहीत. तसे बघीतले तर सरकारने आपल्या अनलॉक चारच्या निर्देशांमध्ये १०० लोक एकत्र होण्याची परवानगी दिली आहे. पूर्व भारतीय कॅप्टन बाईचुंग भूटिया फुटबॉल स्कूल द्वारा डिजाइन केलेल्या ऍप ‘एनजोगो’ च्या वर्चुअल लॉन्चच्या पर्वावर रिजिजू यांनी सांगितले की,  कोविड-१९ महामारी मुळे हे सांगणे कठीण आहे की, दर्शकांची स्टेडियममध्ये परतणी कधी होणार. भारतात आतापर्यंत कोविड-१९ संक्रमितांची संख्या ३९ लाख च्या वर गेली आहे.

ते म्हणाले, ‘दर्शकांच्या स्टेडियममधील परतणीवर निर्णय घेऊ शकणार नाही. मला माहिती नाही की, पुढच्या एक-दोन महिन्यांत या महामारीचे प्रमाण आणखी कीती वाढणार आहे.’

गृह मंत्रालयाने २९ ऑगस्टला खेळांसहीत समीतीकरता लोकांच्या संख्येला परवानगी दिली आहे जी १०० दर्शकांपर्यंत आहे पण ही २१ सप्टेंबर पासून लागू होणार. आधी ३१ ऑगस्टपर्यंत पुर्णपणे निर्बंध लावण्यात आले होते. .

मार्गदर्शक सूचनांनूसार हे मर्यादित प्रेक्षक अनिवार्य नियमांनुसार मैदानात जाऊ शकतात. ज्यात चेहर्यावर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्कैनिंग आणि हाथ धुणे किंवा सैनिटाइज करणे हे आहे.

रिजिजू यांनी सांगीतले की, स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यावर निर्णय स्थानीय अधिकार्यांद्वारा घेण्यात येईल जे गृह मंत्रालय द्वारा जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार असेल. त्यांनी सांगीतले, ‘मला माहीती आहे की, अनेक प्रेक्षक हैराण असतील की असे कसे होईल, बर्याच लोकांनी यावर प्रतीक्रीया दिल्या आहेत, ज्या चांगल्या नव्हत्या. हा देश लोकतांत्रिक देश आहे, लोकांचे आपले विचार असतील आणि आम्हाला नाही वाटत की, आम्ही या टिप्पण्यांवर उत्तर द्यायला पाहीजे.’

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of