क्रीडा

भारताची खराब सुरुवात, कोहली, शर्मा तंबूत परतले

मॅंचेस्टर – पावसामुळे काल अर्ध्यातच भारत विरुद्ध न्यूझीलंडचा रंगलेला सामना ४६.१ व्या षटकात थांबवण्यात आला होता. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ५ गडी बाद २११ धावा इतकी होती. रॉस टेलर हा नाबाद ६७ आणि टॉम लाथम हा नाबाद ३ धावांवर खेळत होते. मंगळवारी खेळ ज्या षटकात, ज्या चेंडूवर थांबवण्यात आला होता, तेथूनच आज पुन्हा सुरू झाला. सध्या न्यूझीलंडने भारतापुढे २४० धावांचे आव्हान समोर ठेवले आहे.

मात्र अवघ्या ५ धावांवर २ महत्त्वाचे विकेट भारतीय संघाने गमावले आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची विकेट गेली आहे.

कालच्या धावसंख्येत न्यूझीलंडने आज केवळ 28 धावांची भर टाकली. न्यूझीलंडचा संघ 50 षटकांत 8 बाद 239 धावसंख्येपर्यत मजल मारू शकला. त्यामुळे विजयासाठी भारतीय संघाला 50 षटकांत 240 धावांचे आव्हान मिळाले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of