क्रीडा

मराठमोठ्या दिसणाऱ्या आजी आहेत या गावच्या

बर्मिंघम येथे काल भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारतीय संघाला चिअर करणारी आजीबाई आठवतायत का तुम्हाला. हातात भलीमोठी पिपाणी घेऊन भारतीय संघाला प्रोत्साहन देणाऱ्या या आजीबाईंची सामना जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भेट घेतली.

त्या आजीबाईंनी सामना सुरू असताना गालावर तिरंगा आणि हातात पिपाणी घेऊन टीम इंडियासाठी जोरदार चिअर करत होत्या. भारताची फलंदाजी सुरू असताना चौकार-षटकार लागतातच आणि नंतर आपल्या गोलंदाजांच्या यशावर या आजीबाई हातातील पिपाणी वाजवत प्रोत्साहन देत होत्या त्यांचा हा उत्साह पाहून मैदानातील सर्वांनीच त्यांना दाद दिली.

त्यांचे नाव चारुलता पटेल असून त्या ८७ वर्षाच्या आहेत.त्या मूळच्या टांझानियाच्या असून त्यांचे आई-वडील भारतीय होते. भारतात जन्म झाला नसला तरी आपल्याला भारतीयांविषयी कमालीचे प्रेम असल्याचं या आजीबाईंनी सांगितलं.

त्यांना दोन मुले असून या दोघांना देखील क्रिकेट खेळण्याची आवड आहे तर आपल्याला क्रिकेट पाहण्याची आवड आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of