क्रीडा

मुष्टियोध्दा सरिता देवी कधीपर्यंत राहील क्वारंटीन…

 

नवी दिल्ली – पूर्व विश्व चॅम्पियन मुष्टियोध्दा एल सरिता देवीने कोविड-१९ वर मात केली आहे. पण ती आपल्या मुलाकरता इंफाळला  आपल्या घराबाहेर कमीतकमी १० दिवसांपर्यंत वेगळी राहू ईच्छीते. या ३८ वर्षांच्या मुष्टीयोध्दाला १७ ऑगस्टला तीचे पति थोइबा सिंह योबत या घातक वायरसचे संक्रमण झल्याचे आढळले होते. त्यांचे परीक्षण केल्यास ते निगेटिव आल्यावर त्यांना हॉस्पीटल मधून सुट्टी देण्यात आली होती.

सरिता ने सांगीतले, ‘माझे परीक्षण निगेटिव्ह आल्यावर सोमवारी परत आले होते. माझ्या पतिला मागच्या आठवड्यात सुट्टी मिळाली होती, पण माझी टेस्ट पॉजिटिव आल्याने मला कोविड केयर सेंटर मध्ये काही दिवस आणखी राहावे लागले. देवाच्या कृपेने आता मला सुट्टी मिळाली आहे.’

ती इंफळ येथे तीच्या अॅकॅडमी जवळील हॉस्टेल मध्ये थांबली आहे, जेणेकरून तिचा ७ वर्षांचा मुलगा तोमथिन याला कुठल्याप्रकारचा धोका होणार नाही. तीच्या मुलाची मागच्या महिन्यात केलेली चाचणी निगेटिव्ह आली होती.

पुढे ती बोलली, ‘जर मी घरी गेले तर तो धावून माझ्याकडे येईल आणि ही जोखीम घ्यायला ती तयार नाही. त्याच्याकरता तीने स्वत:ला अॅकॅडमी हॉस्टेल मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.’ ‘माझे पतिपण ईथेच आहेत, पण त्यांचे वेगळे राहणे  पुढील  दोन दिवसात संपणार आहे कारण त्यांना माझ्या आधी हॉस्पीटल मधून सुट्टी झाली होती.’

सरिताच्या आधी दिग्गज मुष्टियोध्दा डिंको सिंह हा पण वायरस ने संक्रमित झालेले आढळले होते. ते कँसरशी पण लढत आहेत. डिंको सिंह जवळजवळ एक महीन्यापर्यंत हॉस्पीटलमध्ये  राहील्यावर कोविड-१९ वर मात करू शकले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of