क्रीडा

म्हणून धोनीला निवृत्ती घेण्यापासून थांबवलं !

वर्ल्ड कप मध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता धोनीला निवृत्ती घेण्यापासून टीम इंडियाने थांबविले असे बोलले जात आहे.

भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांनी संघाबाबत काही रणनीती बनवली आहे. रिषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आले असले तरी तो जायबंदी झाला तर काय करायचे, हे प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे पडलेला आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेट विश्वचषक येत्या काही महिन्यांमध्ये खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकात जर पंत दुखापतग्रस्त झाला तर निवड समितीपुढे धोनीसारखा पर्याय असेल. त्याबरोबर धोनीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे धोनीने संघाचा मार्गदर्शक म्हणून का पाहावे, असेही संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने धोनीला निवृत्ती घेण्यापासून परावृत्त केले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of