क्रीडा देश

लोकसभा निवडणुकांमुळे रोखले आयपीएलचे वेळापत्रक

नवी दिल्ली

यंदा देशात लोकसभा निवडणूक आहे. त्यातच आयपीएलच्या 12 हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या नाही. त्यामुळे आयपीएलच्या हंगामाचे वेळापत्रक बीसीसीआयने रोखले आहे.

निवडणुकीच्या तारखा स्पष्ट झाल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असं बीसीसीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मार्चमध्ये आयपीएलच्या हंगामाच्या तारखा निश्चित करण्यात येणार आहे.

याआधी 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. मात्र यावेळी आयपीएल भारतातच होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of