क्रीडा

वर्ल्डकपमध्ये कोहलीच्या फलंदाजी क्रमवारीत बदल

इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या विश्वचषक स्पर्धेत तेथील गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री नवीन प्रयोग कऱण्याची शक्यता आहे. त्यांच्यानुसार विराट कोहलीने तिसऱ्या ऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, तसा विचार सध्या शास्त्री करत आहेत.

कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यास भारतीय फलंदाजीला आणखी मजबूती येईल. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर दुसऱ्या फलंदाजाला आपण पाठवू शकतो. कोहलीमुळे भारतीय फलंदाजी आणखी मजबूत होईल, असंही त्यांच म्हणणे आहे. हा प्रयोग धोकादायक आहे, पण विश्वचषक स्पर्धेसाठी तुम्हाला असा निर्णय घ्यावाच लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of