क्रीडा

विराट म्हणतो लग्नानंतर माझ्या नेतृत्वात सुधारणा

वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी ICCच्या एका कार्यक्रमात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे.

लग्नानंतर माझ्या नेतृत्वात सुधारणा झाल्याचे वक्तव्य विराट कोहलीने केले आहे. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये झाले होते.

विराटने आपल्या नेतृत्वात होत असलेल्या सुधारण्याचे श्रेय पत्नी अनुष्का शर्माला दिले आहे. लग्नानंतर माझ्या खेळांमध्येच नाही तर नेतृत्वातही खूप सुधारणा झाली आहे, असे विराट म्हणाला. ‘लग्नानंतर आपण आधिक जबाबदार होतो आणि जिम्मेदारी घेऊन वागायला लागतो. लग्नानंतर आपल्याला अनेक गोष्टी समजायला सुरूवात होते. आपण प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करायला लागतो, असे विराट कोहलीने सांगितले.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of