क्रीडा

वेस्ट इंडिजमध्ये श्रेयस, शिखर धवनची धम्माल, मस्ती पाहिलीत का ?

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचा बुधवारी (१४ ऑगस्ट) विंडिज विरुद्ध तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना होणार आहे. या मालिकेतील पहिला भारत-विंडीज सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. याचबरोबर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज मध्ये धमाल करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यामध्ये सलामीवीर शिखर धवन, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, खलील अहमद आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. भारताचे हे खेळाडू एका नदीकाठी मजा करताना दिसत आहेत. डोंगऱ्याच्या कडेकपाऱ्यात पारंब्यांना लोंबकाळून पाण्यात पोहोण्याचा आनंद घेताना दिसले. याशिवाय, शिखर धवन आपल्या सुपरकूल अंदाजात बोटीवरून ‘फ्लिप’ उडी मारत पोहण्याचा आनंद घेतला. तसेच इतर खेळाडूंनीही तुफान मजा मस्ती केली. इतकेच नव्हे तर विंडिजचे कायरन पोलार्ड, निकोलस पूरन हे खेळाडू देखील टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत दिसले.

View this post on Instagram

Open water, the greenery and fresh air = bliss. 😄

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

View this post on Instagram

You can’t tell me I ain’t fly!

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41) on

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of