क्रीडा

शाहरुख आणि ब्राव्होचा लुंगी डान्सचा व्हिडीओ पाहिलात का?

shahrukh khan dance

वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि अभिनेता शाहरुख खान हे दोघे एका पार्टी मध्ये लुंगी डान्स या गाण्यावर भन्नाट नाचताना दिसले. ब्राव्होने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

अभिनेता शाहरूख खानची मालकी असलेला ट्रिनबागो नाइट रायडर्स संघ सध्या कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये खेळत आहे. कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली या संघाने लीगमध्ये तीन मोठे सामने जिंकले. संघाच्या या कामगिरीनंतर शाहरूख आणि बाकी सदस्यांना पार्टी करण्यासाठी एक चांगलीच संधी मिळाली. शाहरूख आणि क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो प्रायव्हेट बोटवर पार्टी करत आहे. ब्राव्होने या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये शाहरुख आणि ब्राव्हो लुंगी डान्सवर मस्त नाचताना दिसत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of