kapil dev
क्रीडा

‘बीसीसीआय’च्या सल्लागार समितीचा कपिल देव यांनी दिला राजीनामा

भारतीय क्रीकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी ‘बीसीसीआय’च्या सल्लागार समितीचा राजीनामा आज दिलेला आहे.

भारताला १९८३च्या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देणारे कर्णधार कपिलदेव हे समालोचक, एका फ्लडलाइट्स कंपनीचे मालक, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे सदस्य त्याचबरोबर क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष कपिल देव यांनाही परस्परहितसंबंधाच्या तक्रारीवरून नोटीस पाठवली असून १० ऑक्टोबपर्यंत आपले उत्तर देण्यास सांगितले आहे. प्रतिज्ञापत्राद्वारे या तक्रारीला प्रत्युत्तर देण्याच्या सूचना ‘सीएसी’च्या सदस्यांना करण्यात आल्या आहेत. त्या दरम्यान कपिल देव यांनी राजीनामा दिला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of