क्रीडा

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही घोषणा बीसीसीआचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज  केली आहे.

राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती देताना, “आम्ही सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. तरी, 23 ऑक्टोबरला याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल”, असे सांगितले. 23 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची निवडणुक होणार आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीने एकट्याने फॉर्म भरल्यामुळे त्याची बिनविरोधात निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांची सचिवपदी निवड झाली आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of