क्रीडा

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी 15 वर्षाच्या शुटरने केली 30 हजारांची मदत

कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेकजण मदतीसाठी पुढे धावून आले आहेत. उद्योगपती, क्रिकेटर, सेलिब्रेटी, सामाजिक संस्था यांनी सरकारला मदत केली आहे.

यामध्ये आता १५ वर्षांच्या इशा सिंह या शूटरचा समावेश झाला आहे. इशाने आपल्या आतापर्यंतच्या सेव्हिंगमधून ३० हजार रुपयांची मदत दिली आहे. ३०हजार ही रक्कम आतापर्यंत आलेल्या मदतीमध्ये कमी असेल. पण १५ वर्षांच्या इशाचं मन मोठं असल्याचं दिसून येतं. यानंतर तिचं सोशल मीडियावर कौतुक होत असून तिला नेटिझन्स कडक सॅल्यूट करत आहेत.

इशाने या मदतीसंदर्भात सोशल मीडियावर ट्विट केलं आहे. महत्वाचं म्हणजे तिचं ट्विट केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी रिट्विट करून इशाचं कौतुक केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की, तू अवघ्या १५ वर्षांची असूनही खरी चॅम्पियन आहेस.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of