क्रीडा

VIEDIO: विराट कोहली करतोय हरभजन सिंगच्या गोलंदाजीची नक्कल

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाने धमाकेदार सुरुवात केली आहे. इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला. भारताने ही मॅच १५ बॉल बाकी असतानाच जिंकली. कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये नाबाद ३० रन केले. मात्र या सामन्याआधी विराट वेगळ्याच मूड मध्ये दिसला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विराट कोहली आणि हरभजन सिंह यांच्यात चांगलीच थट्टा-मस्करी सुरु होती. स्टार स्पोर्टस या  वाहिनीच्या हिंदी कार्यक्रमात बोलत असताना, विराटने चक्क हरभजनच्या गोलंदाजीची नक्कल केली. ही नक्कल पाहून हरभजनलाही हसू आवरलं नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of