क्रीडा

वानखेडेवर ‘या’ दिवशी रंगणार आयपीएलचा पहिला सामना

आयपीएलच्या 13 व्या हंगामाची तारीख आता निश्चित झाली आहे. 29 मार्चपासून या हंगामाला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा मुंबईच्या वानखेडे मैदानावर 29 मार्चला होणार आहे. आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स टीम आपल्या घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देणार आहे.

मात्र, आयपीएलच्या हंगामाला मार्चपासून सुरुवात होणार असल्यामुळं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना फटका बसण्याची शक्यता आहे. कारण याचदरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड यांच्यात टी-20 तर इंग्लंड-श्रीलंका यांच्याच कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळं या संघाचे खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल जुन्या वेळापत्रकानुसार एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सत्राची सुरुवात करेल, अशी फ्रँचायझींना आशा होती. कारण ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टी -20 मालिका 29 मार्च रोजी संपेल, तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी सामना 31 मार्चपर्यंत संपेल. अशा परिस्थितीत आपल्या मोठ्या खेळाडूंशिवाय स्पर्धा सुरू करणे चांगले नाही. यामुळंच संघांना 1 एप्रिलपासून आयपीएलची सुरुवात करायची होती.

 

 

 

 

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of