क्रीडा

आयपीएलचा तेरावा हंगाम देशाबाहेर खेळविला जाणार

आयपीएलचा तेरावा हंगाम देशाबाहेर खेळविला जाणार असल्याची शक्यता आहे. श्रीलंका आणि अमिराती (UAE) क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएलचा तेरावा हंगाम आपल्या देशात भरवण्याचा प्रस्ताव दिला होता. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएसला अशी माहिती दिली की, आयपीएलचं आयोजन भारतातच करावं अशी सगळ्यांची इच्छा होती पण कोव्हिड -19 मुळे जी परिस्थिती उद्भवली आहे ती लक्षात घेता ही लीग यूएई किंवा श्रीलंका येथे आयोजित करणं भाग पडू शकतं.

या अधिकाऱ्याने असंही सांगितले की, ‘जिथे आयपीएलचं आयोजन केलं जाईल त्या जागेबाबत आम्हाला अद्यापही निर्णय घ्यायचा आहे, परंतु यावर्षी ही लीग देशाबाहेर खेळवली जाण्याची शक्यता अधिक आहे. भारतात अशी परिस्थिती नाही की बरेच संघ येथे एक किंवा दोन ठिकाणी खेळतील. जरी सामने रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळविण्याचा विचार केला तरी परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही.’

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of