क्रीडा

भारताचा हा खेळाडू करतोय कोरोना विरुध्दच्या हेल्पलाईन सेंटरसाठी काम

कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडू सध्या घरी आहेत. मात्र भारताच्या या खेळाडूने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. फुटबॉलपटू सी.के.विनीतने केरळ सरकारच्या करोनाविरुद्ध हेल्पलाईन सेंटरवर नागरिकांना या विषाणूविरोधात लढण्यासाठी मदत करतोय.

“मी ज्यावेळी केरळमध्ये परत आलो, त्यावेळी Kerala Sports Council तर्फे मला या कामाबद्दल विचारण्यात आलं आणि मी देखील याला लगेच हो म्हटलं. सध्याच्या खडतर काळात माझ्याकडून जी काही मदत होणं शक्य आहे ती मी करतोय.” अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात विनीतने आपली प्रतिक्रीया दिली आहे. विनीत हा केरळमधला सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटू मानला जातो. २८ मार्चपासून विनीतने केरळमधील हेल्पलाईन सेंटरवर काम करायला सुरुवात केली आहे. लॉकडाउन पूर्णपणे बंद होईपर्यंत आपण असंच काम सुरु ठेवणार असल्याचं विनीतने स्पष्ट केलं.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of