क्रीडा

हॅलो देवी प्रसाद ? के एल राहुलने शेअर केला सुनिल शेट्टीच्या मुलीसोबतचा ‘हा’ फोटो

भारताचा क्रिकेटपटू केएल राहुल सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री आथिया सोबतचा एक फोटो त्याने शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या दोघांची चर्चा सुरु आहे.

आथिया किंवा राहुल यापैकी कोणीच त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोललेलं नाही पण त्यांनी त्यांच्या नात्याला नाकारलेलंही नाही. काही दिवसांपूर्वी एका पार्टीनंतरचे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता मात्र खुद्द राहुलनंच आथियासोबतचा एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केल्यानं हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे या फोटोवर अथियाचे वडील अभिनेता सुनिल शेट्टीनंही कमेंट केली आहे.

के एल राहुलनं आथियासोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्यानं फोनचा रिसिव्हर कानाला लावलेला दिसत आहे. तर दुसरीकडे आथिया त्याच्या बाजूला उभी राहून हसत असल्याचंही दिसत आहे. राहुलनं हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘हॅलो, देवीप्रसाद…?’ राहुलच्या या फोटोवर हार्दिक पांड्यानं इमोजीसोबत ‘क्यूटीज’ असं कमेंट केली आहे. तर सुनिल शेट्टीनं ‘लाफिंग इमोजी’ पोस्ट केले आहेत. राहुलनं या फोटोला जे कॅप्शन दिलं आहे हे सुनिल शेट्टीच्या ‘हेरा-फेरी’ मधील डायलॉग आहे.

View this post on Instagram

Hello, devi prasad….?

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl) on

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of