क्रीडा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात !

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शुक्रवारी दिमाखदार सुरुवात झाली. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले.

दरम्यान, आजच्या पहिल्याच दिवशी ५७ आणि ७९ किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. यात (७९ वजनी गट- माती विभागात) उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सोलापूरच्या सागर चौगुलेला ५-० गुणाने हरवत सुवर्णपदक पटकाविले. तसेच रौप्य पदकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदे याने परभणीच्या गिरिधारी दुबे यावर ८-२ अशी मात करीत रौप्य पदक पटकाविले.

५७ किलो वजनी गटात माती विभागात आबासाहेब अटकळे याने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकरवर विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम फेरीसाठी आबासाहेब अटकळे व संतोष हिरूगुडे यांच्यामध्ये ८-८ अशी बरोबरी झाली. यावेळी आबासाहेब यांनी शेवटचा गुण मिळविल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. हे दोघेही काका पवार यांच्या कात्रज येथील तालमीचे मल्ल आहेत.

उद्या, ४ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात रामचंद्र कांबळे विरुद्ध रवींद्र खरे यांची गादीवरील लढत होणार आहे.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of