क्रीडा

कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी शमीला न्यायालयाकडून दिलासा

mohammed shami

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. शमीविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटला पश्चिम बंगालमधील अलीपूर जिल्हा न्यायलयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशी माहिती मोहम्मद शमीचे वकील सलीम रहमान यांनी दिली आहे.

जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत शमीविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, शमी १२ सप्टेंबरला भारतात परतेल. सध्या तो आपले वकील सलीम रहमान यांच्याशी संपर्कात आहे.

गेल्या आठवड्यात शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमदविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर शमी अमेरिकेला गेला आहे. तो बीसीसीआयबरोबरच वकिलाच्याही संपर्कात आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of