क्रीडा

धोनीची लेक म्हणते, रणवीरने माझा गॉगल का चोरला ?

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याची मुलगी झिवाचा एक गंमतीदार किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. धोनीची मुलगी झिवाने चक्क अभिनेता रणवीर सिंग याच्यावर गॉगल चोरीचा आरोप केला आहे.

धोनीने आपली मुलगी झिवा हिचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये झिवा आणि रणवीर सिंग या दोघांनी काहीसा सारखाच गॉगल लावला आहे. ‘जेव्हा झिवाने रणवीरला गॉगल घातलेला पाहिले तेव्हा तिने विचारले की माझा गॉगल त्याने का घातला? त्यानंतर ती वरच्या खोलीत गेली. स्वत:चा गॉगल घेऊन आली आणि म्हणाली की माझा गॉगल तर माझ्याकडेच आहे. धोनी हे देखील म्हणतो की, झिवा ज्यावेळी रणवीरला भेटेल तेव्हा ती आपल्या सारख्या गॉगल बद्दल त्याला सांगेल हे मात्र नक्की.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of