क्रीडा

‘या’ प्रसिध्द टेनिसपटूला कोरोनाची लागण

जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण झाली आहे. जोकोविचची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जोकोविचची पत्नीला देखील कोरोना झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे जोकोविचच्या मुलांना कोरोनाची लागण झालेली नाही. जोकोविचने एड्रिया टूरमध्ये सहभाग घेतला होता. या टूरमध्ये सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

जोकोविच क्रोएशियात अॅड्रिया टेनिस टूर्नामेंटला गेला होता. तिथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम व्यवस्थित पाळले गेले नसल्याची तक्रार येत आहे. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झालेली होती आणि त्यांच्यामुळेच संसर्ग पसरला, असे आरोप आता होत आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of