, Rohit sharma shared funny video
क्रीडा

शिखर धवनला आहे, झोपेत बडबडण्याची सवय

भारत आणि  दक्षिण अफ्रिका यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना रविवारी 22 सप्टेंबर रोजी बंगळुरूच्या चिन्नस्वामी मैदानावर होणार आहे. यासाठी भारतीय संघ बंगुळुरूला गुरुवारी रवाना झाला. मात्र रोहित शर्मा आणि शिखर धवनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. झाले असे की, रोहितने शिखर झोपेत बडबडत असल्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

रोहित हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हणाला की, शिखर माझ्याशी बोलत नाही आहे. त्याचा एक काल्पनिक मित्र आहे. त्या मित्राशी कदाचित संवाद साधत आहे. त्याच वय झालं आहे, त्यामुळे असं होत आहे. का एवढे वेडे झाले आहेत जट्ट जी”, असे कॅपशन लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने धवनला टॅगही केले आहे. या व्हिडिओवर शिखरने, “मी शायरीची प्रॅक्टिस करत होतो आणि या महाशयांनी व्हिडिओ केला. मनापासून काही तरी आठवत होतो, मज्जा आली. असा अभ्यास जमला असता तर…”, असे उत्तर दिले आहे. या व्हिडिओवर युवराज सिंग, शार्दूल ठाकूर यांनीही कमेंट केल्या आहेत.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of