virat-anushka
क्रीडा

यामुळे अनुष्काने केले विराटचे कौतुक

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी प्रसिध्द जोड्यांपैकी एक आहे. अनुष्का विराटचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकत्याच पार पडलेल्या इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स’मध्ये अनुष्का आणि विराटने हजेरी लावली होती. यावेळी अनुष्काने विराटचे तोंडभरुन कौतुक केले.

इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स’च्या दुसऱ्या वर्षी क्रीडा क्षेत्रातील विविध खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. आरपी- एसजी ग्रुपचे अध्यक्ष संजय गोएंका आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. १७ खेळातील वेगवेगळ्या खेळाडूंना यावेळी सन्मानित करण्यात आले. ‘आईएसएच’च्या ज्यूरी सदस्यांद्वारा ११ श्रेणींमधील विजेत्यांची निवड यावेळी करण्यात आली.

यावेळी अनुष्का म्हणाली, फार कमी वेळातच प्रशंसनीय कामगिरी बजावणाऱ्या विराटची स्तुती केली. अनुष्काने यावेळीसुद्धा पतीला पाठिंबा देण्याची संधी दवडली नाही, असंच म्हणावं लागेल. ‘मी या कार्यक्रमात उपस्थित असल्याचे फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे माझे पती विराट. मला त्याचा फार अभिमान वाटतो. तो भारताच्या भविष्यासाठी फार चांगलं काम करत आहे’, असेही ती म्हणाली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of