क्रीडा

विराट कोहली ठरला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार !

virat kohli

टीम इंडियाने कसोटी मालिकेत विडिंजचा पराभव केला आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारताने विडिंजच्या संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवले. या विजयासोबतच विराट कोहली भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार झाला आहे. भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांनाही ही गोष्ट जमल्याचे पाहायला मिळाले नव्हते.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा २८ वा विजय आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २७ कसोटी सामने जिंकले होते. माजी कर्णधार धोनीने ६० कसोटी सामन्यात भारताला २७ सामने जिंकून दिले होते. कोहलीने ४८ व्या सामन्यात २८ वा विजय साजरा करत नवा विक्रम नावे केला आहे. विराट कोहली आशिया खंडातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत फक्त दहा सामने गमावले आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of