क्रीडा

यामुळे नेटकरी विराटला म्हणतात, तुझी पण पोलिसांनी पावती फाडली का?

virat kohli shirtless photo

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात मोठे यश संपादन केले आहे. मात्र आता विराट कोहली एका वेगळ्याच कारणामुळे ट्रोल झाला आहे. विराटने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. यामुळे नेटकऱ्यांनी या फोटोमुळे त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

तुझी पण वाहतुक पोलिसांनी पावती फाडली का, असं म्हणत नेटीझन्सनी विराटची थट्टा उडविली. सध्या वाहतुक पोलिसांनी दंडाची रक्कम वाढविल्यामुळे तो एक चर्चेचाच विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तिला चक्क 23 हजार रुपयांचा दंड लावला होता. यामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि जोक देखील फिरत होते. आता याच मुद्दयावरुन विराटलाही ट्रोल केले जात आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of