क्रीडा

‘बस्स झालं आता मला लॉकडाऊन झेपत नाही’

“एकदा लॉकडाउन संपलं की मी घरी परतणार नाही. आता मला हे सहन होत नाहीये, मी आता अधिक काळ घरात राहू शकत नाही. सध्या जितका वेळ मी घरात राहतो आहे पुढच्या ३ वर्षात मी घराबाहेर राहून सगळं भरुन काढणार आहे. मी जवळच्या हॉटेलमध्ये रहायला जाईन पण घरात राहणार नाही. बस्स झालं आता मला लॉकडाउन झेपत नाही”, अशी प्रतिक्रीया भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने एका वाहिनीच्या क्रार्यक्रमात बोलत असताना दिली आहे.

मला सारखं मैदानावर जावसं वाटतंय, मला गोलंदाजीचा सराव करायचा आहे. सध्या क्रिकेट खेळायला खूप संधी आहे आणि नेमक्या याच वेळेत तुम्हाला घरी बसून रहावं लागतय. मी आता जो काही आहे ते क्रिकेटमुळेच…त्यामुळे ज्या दिवशी लॉकडाउन संपेल त्यादिवशी मी घराबाहेर जाऊन सरावाला सुरुवात करणार आहे, चहल आपल्या लॉकडाउनच्या अनुभवाबद्दल सांगत होता.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of