महाराष्ट्र

अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करण्यावर नाथाभाऊंनी सोडले मौन

जळगांव – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्या पक्षाने दुर केले आहे. त्यांच्या राजकीय करिअरला जवळपास ब्रेक लावला आहे असे म्हटले तरी चूक ठरणार नाही. उद्या घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात खडसे प्रवेश करणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र, एकनाथ खडसे यांनी याबाबत खुलासा केला आहे. खडसे म्हणाले, राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला […]

देश

‘त्या’ पंधरा वर्षांचा हिशोब भाजपने द्यावा

ग्वाल्हेर – मध्यप्रदेशात मागील पंधरा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. या पंधरा वर्षात भाजपने काय केले याचा हिशोब त्यांनी द्यायला हवा, अशी मागणी माजी मुख्यमंत्रकमलनाथ यांनी केली आहे. आपले सरकार या राज्यात केवळ पंधरा महिन्यांसाठी होते या पंधरा महिन्यांच्या कालावधीचा हिशोब मागण्याऐवजी भाजपने त्यांच्या पंधरा वर्षाच्या राजवटीचा हिशोब आधी दिला पाहिजे, असे ते म्हणाले. भाजपने पैशाचा […]

महाराष्ट्र

ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडून छळाची अपेक्षा नव्हतीः एकनाथ खडसे

ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांच्याकडून आम्हाला छळाची अपेक्षा नव्हती अशी खंत व्यक्त करत भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर टीका केली आहे. भाजपाचं आजचं चित्र राज्यात उभं राहिलं ते जनतेला मान्य नाही असं म्हणत गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे यांनी पक्षातली खदखद बाहेर आणली. एवढंच नाही पंकजा मुंडे यांचा निवडणुकीतला पराभव ठरवून […]

महाराष्ट्र

नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ लवकरच भाजपमध्ये विलीन होणार

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लवकरच भाजप मध्ये विलीन होणार असल्याची माहिती आहे. आमदार नितेश राणे हे सध्या भाजपच्या तिकिटावरच कणकवली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमान पक्षाची भाजपमध्ये विलीन होण्याची औपचारिकता 15 ऑक्टोबरला पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र विदेश

भाजपाने मला फसवलंः महादेव जानकर

भाजपाने मला फसविले आहे, माझ्या पक्षाला धोका दिला आहे. असा आरोप महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जागावाटपावरून केला आहे. भाजपा-शिवसेना महायुतीचे जागा वाटप झाले. उमेदवारांनी अर्जही भरले. जागावाटपात शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या तर भाजपाच्या वाट्याला मित्रपक्षांसह १६४ जागा आल्या आहेत. यात १५० जागांवर भाजपाने स्वतःचे उमेदवार दिले आहे. जागावाटपात […]

महाराष्ट्र

भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसे, तावडेंना स्थान नाहीच

भाजपची तिसरी यादी आज जाहीर झालेली आहे. मात्र या यादीतही भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्चशिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना स्थान मिळालेले नाही. याचबरोबर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना देखील या यादीत स्थान मिळालेले नाही. तिसऱ्या यादीत शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा यांना रामटेकमधून डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी, साकोली मतदारसंघातून परिणय फुके यांना तर […]

narayan rane
महाराष्ट्र

अखेर नारायण राणेंचा भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरला

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व राज्यसभेचे खासदार नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र आता नारायण राणेंचा भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरला आहे. 2 ऑक्टोबरला राणे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र राजकीय समीकरणांमुळे हा प्रवेश अनेकदा पुढे ढकलला गेला. आता अखेर […]

harshwardhan patil
महाराष्ट्र

हर्षवर्धन पाटील यांनी केला भाजपात प्रवेश

कॉंग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच एक मेळावा घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसंच त्याच मेळाव्यात त्यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत देखील दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट […]

महाराष्ट्र

नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन होणार

स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आपला स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार असल्याची माहिती आहे. १ सप्टेंबरला नारायण राणे आपला पक्ष भाजपात विलीन करत भाजपाप्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. भाजपासोबत राहायचे की नाही याचा निर्णय पुढील १० दिवसांत घेणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी आता आपला पक्ष भाजपात विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे […]

महाराष्ट्र

‘बबन्या’ भाजपमध्ये प्रवेश करताच ‘बबनराव’ कसा झालाः धनंजय मुंडे

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपचे नेते बबनराव पाचपुते राष्ट्रवादीत असताना भाजपसाठी ‘बबन्या’ होते. मात्र भाजपप्रवेश होताच ते बबनराव कसे झाले. असा खोचक टोला मुंडे यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. आज जिंतूर येथे असलेल्या याच यात्रेतून धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार […]