टेक्नॉलॉजी

आता घरबसल्या ‘फस्ट डे फस्ट शो’ पाहता येणार !

देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीनं (RIL) ग्राहकांसाठी अनेक नव्या ऑफर आणल्या आहेत. घरी बसून चित्रपटगृहात लागलेला चित्रपट पाहू शकता. रिलायंस ‘फस्ट डे फस्ट शो’ घेऊन येत आहे. २०२० च्या जूनपर्यंत लोकांपर्यत पोहचण्याची शक्यता मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली आहे.

याचबरोबर तुम्ही घरबसल्या सेट टाॅप बाॅक्सच्या मदतीनं व्हिडिओ काॅल करू शकता. यासाठी सेट टाॅप बाॅक्सला गिगा फायबर नेटवर्कनं जोडलं जाईल. हे सेट टाॅप बाॅक्स मोफत मिळणार आहेत. ग्राहकांना 4K टेलिव्हिजनसह हे सेट बाॅक्स मोफत मिळतील.कंपनीच्या मते ही डिजिटल युगातली क्रांती आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of