टेक्नॉलॉजी

पालकांनो सावधानः स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे दात तुटले

स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे डोळे खराब होतात याची माहिती आपल्याला आहेच. मात्र आता स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे दात तुटत असल्याची तसेच ओठ फाटत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पालकांनी वेळीच सावधान होणे गरजेचे आहे.

लहान मुलांना फोनचे व्यसन लागले असल्यास ती झोपून मोबाईलवर खेळ खेळत असतात. अशावेळी तोंडावर मोबाईल असतो. एका मोबाईलचे वजन 170 ते 250 ग्रॅम असते. यामुळे हे फोन मुलांच्या हातातून निसटल्यास थेट तोंडावर पडतात. यामुळे मुलांचे दात तुटतात. तसेच ओठही फाटतात. अशाप्रकारे दात तुटल्याच्या नुकत्याच 9 घटना समोर आल्या आहेत. या मुलांना एम्समध्ये भरती करण्यात आले होते. यातील काहींच्या ओठांवर टाके घालून शस्त्रक्रिया करावी लागली आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of