टेक्नॉलॉजी

महिंद्राने आणला सर्वात छोटा ट्रॅक्टर

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा टॉय ट्रॅक्टर बाजारात आणण्याच्या तयारीला लागली आहे. महिंद्रा कंपनीचा हा सर्वात छोटा ट्रॅक्टर आहे. अशी माहिती कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी सांगितलेत.

देशातील तरूण जे शेतीत योगदान देत आहेत त्यांच्यासाठी ही एक  चांगली भेट असणार आहे. महिंद्राचा हा नॅनो ट्रॅक्टर पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहे. तो रिमोटच्या मतदीने नियंत्रित केला जाऊ शकतो. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करणे अधिक सुलभ होईल. हा एक १२ व्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असून ३ (फॉरवर्ड + रिव्हर्स) गिअर ट्रान्समिशन आहे. या ट्रॅक्टरमध्ये स्पीड लॉक फंक्शनदेखील समाविष्ट केले गेले आहे. सध्या या ट्रॅक्टरच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of