टेक्नॉलॉजी

बजाजची चेतक आली नव्या रुपात; 2 हजारात करता येणार बुकींग

बजाजची चेतक ही इलेक्ट्रॉनिक स्कुटर नव्या रुपात आली आहे. नव्या चेतक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये इतकी आहे. इलेक्ट्रीक चेतक स्कूटर बजाजने लाँच केली आहे. स्कूटरचे बूकिंग 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

दोन हजार रुपयांमध्ये कंपनीच्या संकेतस्थळावरुन किंवा पुण्यातील चार आणि बंगळुरूमधील 13 डिलरशिपमधून बुकिंगला सुरूवात होईल. चेतक आता जुन्या काळातून बाहेर आली असून पूर्णतः आधुनिक झालीये. रेट्रो-मॉडर्न लुकमुळे ही स्कुटर अत्यंत प्रीमियम दिसते. ही बजाजची पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर असून Urbanite ब्रँड अंतर्गत चेतक स्कूटर इलेक्ट्रिक प्रकारात सादर केलीये.

चेतकचे स्कूटर दोन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. यात शहरी आणि प्रीमियमचे सहा व्हेरिअंट बाजारात उपलब्ध होणार आहेत. कंपनीने दावा केला आहे की, स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 95 किमीपर्यंत धावेल. तसेच स्कूटरवर 3 वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरपर्यंत वॉरंटी मिळणार आहे.

बजाजचे चेतक इलेक्ट्रिक रेट्रो चा लूक स्टायलिश आहे. यात सॉलिड स्टील फ्रेम आणि हार्ड शीट मेटल बॉडीचा वापर करण्यात आला आहे. स्कूटरमध्ये एलईडी लाइट, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट देण्यात आले आहेत. स्कूटरच्या दोन्ही बाजूला 12 इंच अलॉय व्हिल्स आहेत. तसेच या स्कूटरमध्ये रिव्हर्स गिअरसुद्धा असणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of