देश-विदेश

andhra pradesh tourist boat capsizes in godavari river
देश

गोदावरी नदीत बोट उलटली; 11 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपटनम येथे गोदावरी नदीत 61 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बुडाले आहेत. घटनास्थळी ३० जवानांची एनडीआरएफची दोन पथकं दाखल झाली असून बुडालेल्या पर्यटकांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बुडालेल्यांपैकी आत्तापर्यंत २३ जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. अशी […]

sharad pawar criticized on uadayan raje bhosale
महाराष्ट्र

पळपुट्या नेत्यांचा आता जनताच समाचार घेईलः शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या उद्यनराजे भोसले यांचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपुस समाचार घेतला आहे. लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले नेते पळपुटे निघाले, असं म्हणत त्यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. पळपुट्या नेत्यांचा आता जनताच समाचार घेईल. सोडून गेलेले नेते जनतेच्या विकासासाठी नव्हे तर स्व:ताची कातडी वाचवण्यासाठी गेले आहेत, असा घणाघातही […]

Indurikar maharaj

इंदुरीकर महाराज देणार कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना आव्हान

diwakar raote

नवा मोटार वाहन कायदा तुर्तास महाराष्ट्रात लागू नाहीः परिवहन मंत्री

महाराष्ट्र

पंकजा मुंडेंकडे 800 कोटींचा दारुचा कारखानाः धनंजय मुंडे

आमच्या बहिणीकडे काहीही कमी नाही. त्यांच्याकडे औरंगाबादला दारुचा कारखाना आहे. हा कारखाना तब्बल 800 कोटींचा आहे. असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला आहे. अर्धे पैसे लोकसभेला खर्च केले राहिलेले विधानसभेसाठी खर्च करतील अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. परळी विधानसभा मतदार संघातील बंजारा समाज बांधवांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना ते बोलत […]

sambhaji bhide

‘संभाजी भिडेंची इस्त्रोच्या अध्यक्षपदी निवड करावी’

harshwardhan patil

हर्षवर्धन पाटील यांनी केला भाजपात प्रवेश

आपण हे वाचू इच्छित असाल ..

Pakistan

पाकिस्तानचे भारताबरोबर युध्द झाल्यास पाकिस्तानचा पराभव होईलः इम्रान खान

पाकिस्तानचे जर भारताबरोबर युद्ध झाले तर यात पाकिस्तानचा पराभव होईल असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. अल-जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. इम्रान खान यांनी भारताला दोनदा-तीनदा अणुयुध्दाची धमकी दिली आहे. मात्र त्यांनीच एका मुलाखतीमध्ये पराभव मान्य केला आहे. अल जझीराला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारतासोबत युध्द झाले तर पाकिस्तानाला पराभवाचा सामना करावा लागेल असे म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य भारताला दिलेल्या अणुयुध्दाच्या धमकीवर विचारलेल्या प्रश्नावर  केले आहे. इम्रान खान म्हणाले, पाकिस्तान कधीही अणुयुद्धाची सुरुवात करणार नाही. मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे. मी युद्धाच्या विरोधात आहे. युद्धाने समस्या सुटणार नाही, असं मला वाटतं. युद्धाचे अनपेक्षित परिणाम दिसतात.

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठारः डोनाल्ड ट्रम्प

अल कायदाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाला असल्याचे वृत्त अमेरिकन माध्यमांनी आधीच दिलं होतं. त्यावर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी शिक्कामोर्तब केले आहे. ट्रम्प यांच्या वतीने व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'हामजा बिन लादेनचा मृत्यू हा दहशतवाद्यांना धक्का आहे. वडिलांचा दहशतवादी वारसा चालवणाऱ्याचा मृत्यू अतिरेकी संघटनांसाठी इशारा आहे. त्यांचा म्होरक्या आणि कटकारस्थानं रचणारा नेता गेला, ही मोठी गोष्ट आहे.' अमेरिकेने हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत हामजा बिन लादेनला ठार मारण्यात आले आहे. हमजाचा खात्मा झाल्याने दहशतवादविरोधी कारवाईला मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे.  
osama bin ladens son and al qaeda heir hamza bin laden dead
Dubai airport

‘या’ कारणामुळे भारतीय कर्मचाऱ्याला दुबई विमानतळावरुन अटक

भारतीय कर्मचाऱ्याला दोन आंबे चोरल्याप्रकरणी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. 2017 साली दुबई विमानतळावर काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने प्रवाशांच्या बॅगेमधून दोन आंबे चोरले होते. भारतात जात असलेल्या एका बॅगमधून आपण आंबे चोरल्याची कबुली देखील या तरुणाने दिली होती. “मला तहान लागली होती, मी पाणी शोधत होतो. त्यावेळी मी फळांची पेटी उघडली आणि त्यातले दोन आंबे मी खाल्ले अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.’ 2018 साली त्याची पोलिसांनी चौकशी केली आणि समन्स देऊन त्याला सोडण्यात आले होते.  हा तरुण भारतीय प्रवाशांच्या बॅगा उघडून पाहत असल्याचे विमानतळावरिल सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. त्यामुळे  आता त्याला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या प्रकरणातील
Saudi Arabia Aramco company drone attack

सौदी अरेबियातील सगळ्यात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला

जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियातील तेल कंपनी ‘अरामको’च्या दोन फॅसिलिटी सेंटर्समध्ये ड्रोन हल्ला झाला आहे. अशी माहिती सौदीच्या सरकारी गृहमंत्रालयाने दिली आहे. शनिवारी सकाळी सौदीच्या अरामकोच्या दोन तेल संयंत्रांवर विद्रोह्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला झाल्यानंतर दोन्ही तेल कंपन्यांमध्ये भीषण आग लागली होती. दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू केला असल्याचे सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

धक्कादायक; पोलिसच बनला चोर !

पोलिसांनी जप्त केलेला  2 कोटी 16 लाख रुपये किंमतीचा माल एका पोलिस कॉन्स्टेबलने चोरी करुन परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा माल वसई पोलिसांनी जप्त केला होता. याप्रकरणी या पोलिस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. वालिव पोलिसांनी 31 डिसेंबर 2018 रोजी विदेशी कंपनीचा सिगारेटचा माल तस्करी करणाऱ्यांकडून कारवाई करत जप्त केला होता. एका टेम्पोतील 150 गोण्यांमध्ये हा माल भरण्यात आला होता. पोलिसांनी पंचनामा करून टेम्पोसहित जप्त केलेला माल वालिव पोलिस स्टेशनमध्ये आणला. जप्त केलेल्या मालावर निगराणी ठेवणारा मुदैमाल कारकून तसेच सहाय्यक फौजदार शरीफ रमझान शेख (वय 48) याने काही लोकांना सोबत घेत त्यातील 100 गोण्या परस्पर लंपास केल्या. ज्या विदेशी
Vasai police fraud case Mumbai
shiv sena chief arrested for drunkenness

विसर्जन मिरवणूकीत दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या शिवसेना शाखा प्रमुखाला अटक

पिंपरी येथील विसर्जन मिरवणूकीत दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या शिवसेना शाखा प्रमुखाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. विजय सर्जेराव सूर्वे (वय 38, रा. बालाजी हाईटस्‌, मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या शिवसेना शाखा प्रमुखाचे नाव आहे. विजय सुर्वे हा मोहननगर शिवसेना शाखाप्रमुख आहे. गुरुवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सुर्वे याने दारू पिऊन गोंधळ घातला. यामुळे त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठविले. त्यांच्या रक्‍तात अल्कोहोलचे प्रमाण आढल्याने त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी दिली.

ताज्या बातम्या

shahid kapoor
मनोरंजन

काय… शाहिद पुन्हा लग्न करणार

अभिनेता शाहिद कपूर पुन्हा लग्न करणार हे ऐकुन तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना.. हो पण शाहिद पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती खरी आहे. ही बातमी त्याची पत्नी मीरा राजपूत हिनेच दिली आहे. मात्र शाहिद दुसऱ्यांदा जरी लग्न करणार असला तरी त्याची पत्नी मीराच असणार आहे. एका मुलाखती दरम्यान मीराने सांगितले की,  आपण दोघंही पुन्हा लग्न […]

Shraddha kapoor
मनोरंजन

श्रध्दा कपूर लढते ‘या’ गंभीर आजाराशी

अभिनेत्री श्रध्दा कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकतेच तिचे सोहो आणि छिछोरे असे एकापाठोपाठ एक दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर बंपर कमाई केली. त्यामुळे श्रध्दा चांगलीच चर्चेत आहे. मात्र श्रध्दाने एका मुलाखती दरम्यान एक मोठा खुलासा केला आहे. मागच्या सहा वर्षापासून ती एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे तिने सांगितले […]

ranu mondal song, teri meri kahani
मनोरंजन

राणू मंडल यांच ‘तेरी मेरी’ गाणं प्रदर्शित

सोशल मीडियावर आपल्या आवाजाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका राणू मंडल यांच ‘तेरी मेरी कहाणी’ हे पहिलं गाण आज प्रदर्शित झाले आहे. रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानूचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियानं त्यांना त्याच्या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली होती. मागच्या काही दिवसांपासून हिमेशच्या स्टुडिओमधील रानू यांचा व्हिडीओ सुद्धा सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यानंतर […]