महाराष्ट्र

मला जग सोडून जावं वाटलंः धनजंय मुंडे

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी वादग्रस्त टीका केली म्हणून धनंजय मुंडे यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मुंडे म्हणाले, मी कधीही बहिणीला उद्देशून असं बोललो नाही. ते लोकांसाठी होतं. नव्या आलेल्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवले असून, मला जग सोडून […]

महाराष्ट्र

मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळणार नसेल, तर होईल कंपनीवर कारवाई

राज्यभरात येत्या उद्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूका होणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व दुकाने, आस्थापने, निवासी हॉटेल, नाट्यगृहे, खानावळी, व्यापार, औद्योगिक उपक्रम, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे आदी ठिकाणच्या कामगारांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जर कोणत्या कर्मचाऱ्याला […]

महाराष्ट्र

तुमच्याकडे ‘ही’ ओळखपत्रे असतील तरी करता येईल मतदान 

मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान ओळखपत्र मिळालं नसल्यामुळे खूप गोंधळ उडतो. त्यामुळे अनेक जण आपला मतदानाचा हक्क बजावत नाही. पण आता काळजी सोडा तुम्हाला मतदान ओळखपत्र जरी मिळाले नसले तरी तुम्हाला ‘ही’ ओळखपत्रे दाखवून मतदान करता येणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी खबरदारी म्हणून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मतदार यादीत नाव आहे पण मतदार […]

महाराष्ट्र

प्रचारासाठी गेलेल्या उमेदवारालाच दानवे म्हणाले ‘भाद्या बैल’

मुंबई : भाजप खासदार रावसाहेब दानवे यांची ग्रामीण बोली महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. मात्र अनेकदा त्यांना त्यांचे वक्तव्य अंगलट आल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे. त्यातच आता दानवे पुन्हा अशाच एका विधानामुळे चर्चेत आले आहे. पैठणचे शिवसेना उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना दानवे यांनी भुमरे यांचा चक्क ‘भाद्या बैल’ म्हणून उल्लेख केला. त्यांचा हा […]

महाराष्ट्र

भरसभेत पंकजा मुंडे चक्कर येऊन पडल्या

ग्रामविकास मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची आज परळीतील रानी लक्ष्मीबाई टॉवर चौकात ही सभा आयोजित करण्यात आली होती.मात्र या सभे दरम्यान त्या अचानक चक्कर येऊन व्यासपीठावरचं पडल्या. त्यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला. त्यांना लगेच रुग्णालयता दाखल करण्यात आले. पंकजा मुंडे यांनी शनिवारी कन्हेरवाडी, जिंतूर, पाटोदा, वडवणी आणि परळी शहर या पाच ठिकाणी  सभा […]

महाराष्ट्र

कोल्हापूरात बेवारस वस्तूच्या स्फोटाने, एकाचा मृत्यू

कोल्हापूरात एका बेवारस वस्तूला लाथ मारल्यानंतर स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे कोल्हापूर शहर हादरले आहे. कोल्हापुरातील उजळाईवाडी ब्रिजखाली हा स्फोट झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, यामध्ये शेजारी […]

महाराष्ट्र

सलमानच्या बॉडीगार्डने केला शिवसेनेत प्रवेश

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणजेच गुरमीत सिंग उर्फे शेराने शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेराने मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधले. शिवसनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेराने शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती दिली आहे. गेल्या २२ वर्षांपासून शेरा सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. […]

महाराष्ट्र

अन् दिलीप सोपलांच्या एका फोनवर त्याला नोकरीवर परत घेतलं

सोलापूर – गर्दीचा सिझन सुरू होता म्हणून त्या तिघांचं तिकीट काढता आलं नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून तो एसटी (ST ) महामंडळात कंडक्टर म्हणून काम करत होता. आता त्याची बीडला बदली झाली होती अन हा पॅसेंजरच तिकीट न काढल्यामुळ पकडला गेला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला डायरेक्ट बडतर्फच केलं. चूक झाली, माफी मागितली, दंड भरतो म्हंटल, शेवटी मंत्रालयात […]

महाराष्ट्र

“ये बंदा लई जोरात… बाळासाहेब थोरात….”

सध्या राज्यभरात प्रचाराची धामधूम मोठ्या उत्सवात सुरु आहे. यासाठी उमेदवारांकडून आपला हायटेक प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. उमेदवारांची प्रचारगीतेही लोकप्रिय होताना दिसत आहे. मोठमोठे संगीतकार ही प्रचारगीते गात असल्यामुळे नागरिकांनाही ही प्रचारगीते आवडत आहेत. नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाठी लोकप्रिय मराठी संगीतकार – गायक अवधूत गुप्ते यांनी आपल्या धडाकेबाज शैलीत प्रचारगीत तयार […]

महाराष्ट्र

‘आदित्य माझ्याकडे आशिर्वाद घेण्यासाठी आला नाही’ तरीही…..

आदित्य ठाकरे माझ्याकडे आशिर्वाद घेण्यासाठी आला नाही तरीही मी त्याच्या पाठिशी असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. यावेळी राज ठाकरे यांनी उदाहरण देत सांगितलं की, “दिवंगत बाळासाहेब ठाकरे एक व्यंगचित्रकार होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी हात खराब होईल म्हणून त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला पाठवलं नव्हतं. पण […]