spot_img
6.9 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

‘छावा’ आता इंग्रजीतही, चित्रपटाच्या दमदार यशानंतर आली आणखी एक Good News

अभिनेता विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेला छावा (Chhava Movie) या हिंदी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. शिवाजी सामंत यांनी लिहिलेल्या ‘छावा’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. लक्ष्मण उतेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट ज्या मराठी पुस्तकावर आधारित आहे त्याबद्दलही देशभर उत्सुकता निर्माण झाली आहे.

या कादंबरीवर आधारित बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गेली चाळीस दशके मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही कादंबरी त्यामुळे अमराठी वाचकांच्याही चर्चेचा विषय ठरली. आहे. त्यामुळे वाचकांच्या मागणीला प्रतिसाद देत मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘छावा’ कादंबरीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले आहे. शिवाजी सावंत यांच्या कन्या कादंबिनी धारप यांनी हे भाषांतर केले आहे.

‘छावा’च्या यशानंतर देशातील कानाकोपऱ्यातून आणि अगदी जगातील कोपऱ्यातूनही या कादंबरीबद्दल विचारणा होऊ लागली. मेहता पब्लिशिंग हाऊसने यापूर्वीच या कादंबरीच्या इंग्रजी भाषांतराच्या कामास सुरुवात केल्याने चित्रपटाचा मुहूर्त साधत ‘छावा’ची इंग्रजी आवृत्ती बाजारात उपलब्ध करणे शक्य झाले असल्याचे मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अखिल मेहता यांनी सांगितले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या