spot_img
spot_img
spot_img
spot_img

एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर अडचणीत — महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खळबळजनक आरोप

World Marathi News : एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर अडचणीत

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर सध्या रेव्ह पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांच्या अटकेत असून त्यांच्याविरोधात गंभीर आणि धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. global news in marathi

रुपाली चाकणकर यांच्या म्हणण्यानुसार, खेवलकर यांच्या मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये आक्षेपार्ह चॅट्स, नग्न व अर्धनग्न महिलांचे फोटो आणि लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओज सापडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात 42 लाखांहून अधिक किंमतीचे कोकेन, गांजा, मोबाईल फोन्स, चारचाकी गाड्या, हुक्का सेट्स, आणि मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. global news marathi

चाकणकर यांनी असेही उघड केले की, या मोबाईलमध्ये 252 व्हिडीओ आणि 1497 अश्लील फोटो सापडले असून, हे सर्व सामग्री रेव्ह पार्टी आणि लैंगिक शोषणाच्या संदर्भात आहे. या प्रकरणात अनेक महिला बळी पडल्याची शक्यता असून, खेवलकर यांच्या संपर्कात असलेल्या मुलींच्या नावे एका ‘आरुष’ नावाच्या एजंटमार्फत सेव्ह करण्यात आली होती, जो मानवी तस्करीचं रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे.

 todays global news in marathi  या आरोपींनी मुलींना चित्रपटात काम देतो असे सांगून बोलावले व त्यानंतर नशेच्या अवस्थेत त्यांचा लैंगिक छळ केला गेला. या मुलींना नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडीओ वापरले गेले. इतकंच नव्हे तर, घरकाम करणाऱ्या महिलांचेही अत्यंत वाईट अवस्थेतील फोटो खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आढळून आले.

चाकणकर यांनी स्पष्ट केले की, हा संपूर्ण प्रकार अनैतिक मानवी व्यापार व अमली पदार्थांच्या रॅकेटशी संबंधित असल्याची शक्यता असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

हा प्रकार फक्त कायदेशीरच नाही, तर मानवीतेच्या मर्यादाही ओलांडणारा आहे, असा टोला चाकणकर यांनी लगावला. राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणात संपूर्ण सहकार्य व सतत लक्ष ठेवले जात आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या