कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचे एकेक खेळाडू मायदेशी परतले. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा सर्वप्रथम त्याच्या संपूर्ण कुटुंबासह मायदेशी परतला. यानंतर रोहित शर्मा सध्या त्याच्या मुंबईच्या घरी त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. दरम्यान रोहितने त्याच्या लेकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर त्याच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांना गेल्यावर्षी दुसरा मुलगा झाला. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी रोहित शर्माच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. ज्याचे नाव अहान ठेवण्यात आले. रोहित आणि रितिकाला पहिली मुलगी आहे जिचं नाव समायरा आहे. २०१८ मध्ये समायराचा जन्म झाला होता. लेकाच्या जन्मानंतर रितिकाने इन्स्टाग्रामला एक फोटो शेअर करत त्याचे नाव काय ठेवण्यात आले हे चाहत्यांबरोबर शेअर केले.