आपण हातांना किंवा केसांना रंग देण्यासाठी मेंदी वापरतो, पण तुम्हाला माहीत आहे का की तिच्या पानांमध्ये औषधी गुणधर्मही आहेत? तोंडाच्या अल्सरपासून ते गुडघेदुखीपर्यंत, मेंदीचे पान अनेक समस्या दूर करू शकते.
1. गुडघेदुखीवर उपाय
गुडघेदुखीच्या त्रासाने हाल होत असतील, तर एक साधा घरगुती उपाय करून पाहा:
- मेंदी आणि एरंडाची पाने सम प्रमाणात घेऊन त्यांची पेस्ट बनवा.
- ही पेस्ट गुडघ्यांवर लावून काही वेळ तसेच ठेवा.
- शक्य असल्यास, उन्हात बसून हे मिश्रण लावल्यास अधिक चांगला परिणाम दिसून येतो.
2. तोंडाच्या अल्सरवर आराम
तोंडात वारंवार जखमा होत असल्यास किंवा अल्सरचा त्रास होत असेल, तर:
- मेंदीची पाने अर्धा ग्लास पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा.
- त्याच पाण्याने दिवसातून दोन-तीन वेळा गार्गल करा.
- काही दिवसात आराम वाटू शकतो.
3. केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर
कोरड्या किंवा निर्जीव केसांसाठी मेंदी उत्तम उपाय ठरू शकते:
- ताज्या मेंदीच्या पानांची पेस्ट बनवून ती केसांना लावा.
- अर्ध्या तासानंतर केस धुवा.
- यामुळे केस मऊ आणि चमकदार होऊ शकतात.
4. त्वचेच्या समस्यांवर फायदेशीर
- जर त्वचेवर फोड, खाज किंवा बुरशीचा त्रास होत असेल, तर मेंदीच्या पानांची पेस्ट लावा.
- त्यामुळे त्वचा थंड राहते आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.
- Advertisement -