spot_img
spot_img
spot_img
spot_img

हा मराठमोळा क्रिकेटर भाजप मध्ये करणार प्रवेश ! जाणून घ्या कोण आहे तो .

भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या अष्टपैलू खेळीसाठी ओळखला जाणारा मराठमोळा खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) आता क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे. ही बातमी समोर येताच राजकीय आणि क्रीडा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. केदार जाधव आज दुपारी 3 वाजता मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यालयात औपचारिक पक्षप्रवेश करणार असून, यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.

क्रिकेटनंतर राजकारणात नवी इनिंग! केदार जाधव आज भाजपमध्ये करणार प्रवेश

केदार जाधवने काही दिवसांपूर्वीच भाजप नेते आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यानंतरच त्यांच्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर केदारने आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी भाजपची निवड केली आहे. पुण्याचा हा रणदिवस मैदानात जितका आक्रमक होता, तितक्याच जोमाने तो राजकारणातही प्रवेश करत आहे.

केदार जाधवचा क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेतला तर, त्याने भारताकडून 73 वनडे सामने खेळले असून त्यात 1380 धावा केल्या आहेत. त्याच्या खेळातील हायलाईट म्हणजे इंग्लंडविरुद्ध 65 चेंडूत झळकावलेलं दमदार शतक! याशिवाय, त्याने IPL मध्ये 1208 धावा केल्या आहेत. एक चतुर फलंदाज, पार्ट टाइम बॉलर आणि अ‍ॅग्रेसिव्ह फिनिशर म्हणून ओळख मिळवलेला केदार आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात काय धमाका करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या