पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी मोठी घोषणा – पहिल्या नोकरीवर ₹15,000 प्रोत्साहन
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
‘प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना’ ( Pradhanmantri vikasit bharat rojgar yojana ) अंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना ₹15,000 प्रोत्साहनरक्कम देण्यात येणार आहे.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
-
निधी: या योजनेसाठी केंद्र सरकारने ₹1 लाख कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे.
-
रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट: पुढील २ वर्षांत ३.५ कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचा संकल्प.
-
मुख्य लक्ष: उत्पादन क्षेत्राला चालना देऊन रोजगाराच्या संधी वाढवणे.
-
प्रोत्साहनरक्कम: पहिल्या खाजगी नोकरीवर ₹15,000, जी थेट बँक खात्यात जमा होईल.
पात्रता आणि अटी vikasit bharat rojgar yojana marathi
-
उमेदवाराने पहिली नोकरी खाजगी क्षेत्रात मिळवलेली असावी.
-
संबंधित कंपनी EPFO (Employees’ Provident Fund Organisation) मध्ये नोंदणीकृत असावी.
-
उमेदवाराने त्या कंपनीत सहा महिने सातत्याने काम केलेले असावे.
-
सर्व अटी पूर्ण झाल्यावर, प्रोत्साहनरक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल.
अर्जाची गरज नाही
या योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार नाही.
जेव्हा तुमची पहिली नोकरी सुरू होईल आणि पीएफ खाते सक्रिय होईल, तेव्हा तुम्ही आपोआप पात्र ठरता.
EPFO मार्फत सरकारला तुमची माहिती मिळेल आणि सहा महिन्यानंतर पैसे जमा केले जातील.
योजनेचा तरुणांवर होणारा परिणाम PM vikasit bharat rojgar yojana
-
आर्थिक आधार: नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तरुणांना स्थिरतेसाठी मदत.
-
रोजगार वाढ: उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्यांना मोठी चालना.
-
स्वप्नातील भारत: आत्मनिर्भर आणि रोजगारसंपन्न भारताच्या निर्मितीकडे मोठं पाऊल.
पंतप्रधान मोदींचं स्वप्न – ‘विकसित भारत’ PM मोदी
मोदींनी भाषणात सांगितले की, ही योजना केवळ आर्थिक मदत नसून, तरुणांना प्रोत्साहन देण्याचं एक साधन आहे.
भारताच्या विकासयात्रेत तरुणांचं योगदान अधिकाधिक वाढवण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी हा प्रयत्न आहे.
‘प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना’ PM vikasit bharat rojgar yojana ही तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
पहिल्या नोकरीसोबतच आर्थिक आधार मिळाल्याने तरुण अधिक उत्साहाने करिअरची सुरुवात करू शकतात.
ही योजना रोजगारनिर्मितीच्या दिशेने आणि ‘विकसित भारत’ स्वप्नाच्या पूर्ततेसाठी एक भक्कम पाऊल ठरेल.