आयपीएल 2025 मध्ये 8 एप्रिलच्या रात्री झालेल्या पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात जेव्हा पंजाबचा युवा ओपनर प्रियांश आर्य पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकतो, तेव्हा त्याचे इरादे स्पष्ट होतात – आजचा दिवस त्याचाच आहे. पुढच्याच चेंडूवर त्याचा एक झेल सुटतो आणि तिथेच कळून जातं की नशिबही त्याच्यासोबत आहे. त्यानंतर तो थांबला नाही – अवघ्या 39 चेंडूत आयपीएल इतिहासातील चौथा सर्वात जलद शतक झळकावून त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
हे सुद्धा पहा 3 दिवस फेऱ्या, अंडरवेअरमध्ये रोकड, आणि…! हि चोरी पाहून तुम्ही थक्क व्हाल …
42 चेंडूत 103 धावांची वादळी खेळी
त्याने 42 चेंडूत 9 षटकार आणि 7 चौकारांच्या सहाय्याने 103 धावांची विस्फोटक खेळी केली. शशांक सिंगसोबत सहाव्या विकेटसाठी त्याने 34 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली, जेव्हा पंजाबची स्थिती 83/5 अशी बिकट होती. त्याने 19 चेंडूंमध्ये अर्धशतक आणि 39 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत भारतीय फलंदाजांकडून आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक नोंदवलं. मात्र शतक पूर्ण करताच पुढच्या षटकात त्याचा झेल विजय शंकरने घेतला.
कष्टाचा प्रवास – शिक्षकांचा मुलगा, अडीच दिवस होता खचलेला
दिल्लीचा हा आक्रमक सलामीवीर प्रियांश आर्य याला पंजाब किंग्जने 3.8 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये 10 सामन्यांत 608 धावा करत त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी गाठली होती. विशेष म्हणजे त्याने एका ओव्हरमध्ये 6 षटकारही ठोकले होते. त्याच्या आई-वडिलांचा शिक्षण क्षेत्राशी संबंध आहे – वडील पवन कुमार आणि आई राजबाला, दोघंही शिक्षक आहेत.
2024 च्या आयपीएल लिलावात तो अनसोल्ड राहिला होता, आणि यामुळे खूप निराश झाला होता. “दोन दिवस काहीच खायला बसलो नव्हतो,” असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं. पण त्याने हार न मानता आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं आणि 2023-24 सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 166.91 स्ट्राईक रेटने 222 धावा करत दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.