spot_img
spot_img
spot_img
spot_img

19 वर्षाची असताना माझ्यासोबत 3 वेळा…युजवेंद्र चहलसोबत अफेअरच्या चर्चेत असलेली RJ महवश ने सांगितलं नात्यातील सत्य .

युजवेंद्र चहलसोबत अफेअरच्या चर्चेत असलेली RJ महवश – काय आहे खरं?

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांचं नुकतंच विभाजन झाल्यानंतर, चहलचं नाव एका नव्या व्यक्तीसोबत जोडलं जात आहे – ती म्हणजे रेडिओ जॉकी (RJ) महवश. सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटो, व्हिडीओ आणि स्टोरीज पाहून अफवांचा धुरळा उडालाय की या दोघांमध्ये काहीतरी “स्पेशल” आहे. मात्र या चर्चांमध्ये स्वतः महवशनेच स्पष्टता आणली आहे. तिने एक पोडकास्टमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलत अनेक गोष्टी उघड केल्या.

‘३ वेळा माझं मन मोडलं’ – महवशचा हृदयस्पर्शी अनुभव

‘द गुड गर्ल शो’ या पॉडकास्टमध्ये बोलताना महवशने कबूल केलं की, ती सध्या कोणत्याही नात्यात नाही आणि एकटीच आहे. लग्नाचा विचारसुद्धा तिला घाबरवतो. याचे कारण सांगताना तिने आपल्या जुन्या नात्यांचा उल्लेख केला. “मी १९ वर्षांची असताना एक नात्यात होते. त्या व्यक्तीने मला तीन वेळा फसवलं. प्रत्येकवेळी माझं मन तोडलं. त्यामुळे मी खूप भावनिक त्रासातून गेले. मला एंग्झायटी आली, मानसिक त्रास झाला,” असं तिने सांगितलं.

या अनुभवांमुळे ती आता कोणत्याही नात्यात सहजपणे प्रवेश करत नाही. ती म्हणाली, “माझा जोडीदार माझ्याबाबत सीरियस आहे, असा आत्मविश्वास मिळाल्याशिवाय मी कोणालाही डेट करणार नाही.” हे वक्तव्य पाहता चहलसोबतच्या अफेअरच्या अफवा केवळ चर्चेपुरत्याच असल्याची स्पष्टता मिळते.

अफेअर की फक्त मैत्री?

चहल आणि महवश दोघंही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात, काही इव्हेंट्समध्ये एकत्र दिसलेही आहेत. मात्र, हे सर्व काही केवळ चांगल्या मैत्रीच्या पातळीवर असल्याची शक्यता जास्त वाटते. महवशच्या स्पष्ट वक्तव्यांनंतर हे मान्य करावं लागतं की, तिच्या आयुष्यातला हा टप्पा स्वतःला समजून घेण्याचा आहे, आणि ती कोणत्याही नवीन नात्याच्या वाटेवर नाहीये.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या